मेजर ध्यानचंद जयंती निमित्त सायकल रैली : मेरिटोरियस स्कूलचा उपक्रम

0
59

अमरदिप बडगे, तिरोडा ३० – हॉकीच्या जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेरिटोरियस स्कूलतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

खेळकूदामुळे शरीर तंदुरुस्त राहते तसेच बौद्धिक विकासालाही चालना मिळते, असे प्रतिपादन संचालक मुकेश अग्रवाल यांनी यावेळी केले.

सायकल रॅलीची सुरुवात शहरातील गांधी प्रतिमा येथून करण्यात आली व गजानन मंदिर परिसरात तिचा समारोप झाला. गट शिक्षणाधिकारी स्वप्नील रामटेके यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.

या प्रसंगी शाळेचे संचालक मुकेश अग्रवाल, प्राचार्य प्रफुल्ल तिवारी शिक्षणतज्ञ ब्रजेश मिश्रा क्रीडा शिक्षक मुकेश शेंडे व संकेत मोहोड़ यांची प्रमुख उपस्थिती होती.