Home Latest News डी.के.कॉन्व्हेंट इंग्लिश प्रायमरी, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेचा 100% निकाल

डी.के.कॉन्व्हेंट इंग्लिश प्रायमरी, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेचा 100% निकाल

0
3

नागपूर :- सेमिनरी हिल्स येथील श्री दादाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर अंतर्गत संचालित डी.के.कॉन्व्हेंट इंग्लिश प्रायमरी, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेचा सन 2025-26 इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. या निकालात देबोलीना बागची हिने 91.40 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ अनुष्का गोटे हिने 76.60 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, तर यज्ञेश भांगे याने 75.20 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भांगे तसेच सचिव राजेश भांगे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com