खापा :- सावनेर येथे दि. राजेश्री महिला अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि. सावनेरचे उद्घाटन माजी मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष (काँग्रेस कमेटी) महाराष्ट्र राज्य रणजीतबाबु देशमुख यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्ज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ॲड. चंद्रशेखर बरेठीया (संचालक अरविंद सहकारी बँक लि.), प्रमुख पाहुणे म्हणून न. प. सावनेर नगरसेवक अरविंद लोधी, आर्थिक सल्लागार तुळशीराम पोटोळे, सोसायटीच्या अध्यक्षा वंदना निनावे, उपाध्यक्षा शोभा नंदनवार, सचिव मोनाली जोगी, कार्याध्यक्ष ज्योती मोवाडे, ज्योती खोंडे, संचालीका कुसुम नंदनवार, प्रियंका रंगारी, जयश्री लिखार, जिजा कुंभारे, देवकाबाई जोगी, अमिषा पगारे, मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश निनावे, पंकज पगारे, किशोर जोगी, अमोल रंगारी, राजेंद्र नंदनवार, धिरज घायवड, नंदराज मोवाडे तसेच सोसायटीचे कर्मचारी व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.




