हा पक्षप्रवेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वानखडे, सरचिटणीस गोपाल चंदन, श्रीराम नेहार, मनीष कोरपे व गोकुळ भडांगे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
भाजप प्रवेशाचा मुख्य उद्देश
सलीम घनीवाला यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय व श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या ‘अंत्योदय’च्या विचारांनी प्रेरणा घेतल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “सबका साथ, सबका विकास”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसनशील महाराष्ट्राचे स्वप्न आणि पालकमंत्री बावनकुळे व खासदार बोंडे यांची दिशा यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घनीवाला कुटुंबीयांचा राजकीय वारसा
सलीम घनीवाला हे दर्यापूर नगरपरिषदेच्या माजी उपाध्यक्षा झुबेदाबाई घनीवाला यांचे पुत्र असून, त्यांचे वडील जिकरभाई घनीवाला हे एक नामांकित समाजसेवक आणि काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी महत्त्वाचा धक्का मानला जात आहे.
दर्यापूरमध्ये भाजपची घुसखोरी
घनीवाला यांच्या पक्षप्रवेशामुळे दर्यापूरमध्ये भाजपला अल्पसंख्याकांमध्ये पाय रोवण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वात नव्याने अल्पसंख्याक संघटना स्थापन होण्याची शक्यता असून, त्यांना भाजपकडून महत्त्वाची जबाबदारीही दिली जाऊ शकते.
अमरावती. काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात मानला जाणारा घनीवाला कुटुंबीयांचा भाजप प्रवेश हा राजकीयदृष्ट्या मोठा घडामोड ठरली आहे. दर्यापूर येथील घनीवाला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक आणि काँग्रेसशी अनेक वर्षांपासून संबंधित असलेले सलीम सेठ घनीवाला यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.