– भाजपा शिष्टमंडळा चे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना निवेदन
कामठी :- नवी कामठी भागातील प्रभाग 16 मधे सौर ऊर्जा चलित 300 पथदिवे स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी भाजपा महिला आघाडीच्या कामठी शहर उपाध्यक्ष संध्या उज्वल रायबोले यांनी केली आहे.
आज सोमवार 9 मार्च ला दुपारी नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांना संध्या उज्वल रायबोले यांनी निवेदन दिले,नवी कामठी भाग मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे,विविध लेआउट,शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, धार्मिक स्थळे,कब्रस्थान,स्मशान भूमी आणि आय यु डी पी एरिया आहे,
नवी कामठी भागात प्रभाग 16 चा अंतरभाव असून भौगोलिक दृष्टा मोठा परिसर आहे.
प्रभाग 16 मधे 300 सौर ऊर्जा पथ दिवे लावण्या बाबत चे निवेदन महसूल मंत्री व पालक मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांना यापुर्वी देण्यात आले. अशी माहिती संध्या उज्वल रायबोले यांनी नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांना दिली. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष सबा परवीन तौसीफ़ खान प्रामुख्याने उपस्थित होत्या.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात लाला खंडेलवाल,विक्की बोंबले,वैशाली मानवटकर, आशुतोष अवस्थी,चंद्रशेखर तूप्पट यांचा समावेश होता.
पारंपारीक ऊर्जा वापरा बद्द्ल नगर परिषद प्रशासन सकारात्मक असून प्रभाग 16 तील सौर ऊर्जा चलित पथ दिवे बाबत निर्णय घेऊन पुढील आवश्यक कार्यवाही लवकरच करण्यात येईल
-अजय अग्रवाल अध्यक्ष नगर परिषद कामठी