spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनाची वाहतूक बंद करा

– शहर भाजप अध्यक्ष मंगेश यादव यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस निरीक्षक यांना निवेदन

कामठी :- मार्च शहरातून जाणाऱ्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर तसेच कामठी-कळमना मार्गावर अवजड वाहनांची धोकादायक स्पर्धा सुरू असून वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोळसा, रेती, राखड, क्रशसँड, सिमेंट व खडीची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणारी जडवाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत असताना कारवाई होत नाही. नियमांनुसार मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर बंधनकारक असतानाही त्याचे पालन होत नाही. नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकाने तपासणी मोहीम तीव्र करावी आणि कामठी-कळमना मार्गावरील जडवाहतूक आउटर रिंग रोडवर वळवावी. अन्यथा होणार आता त्रास लक्षात घेता आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मंगेश यादव यांनी वाहतूक पोलीस निरीक्षक यांना दिले. यावेळी प्रीतम यादव, लालू यादव, बरकत अली ,पंकज यादव, रोहित तरारे, हिमांशू गुप्ता ,आधी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.