spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संपूर्ण भारतातील राष्ट्रिय राज्य महामार्गावर दुचाकी वाहनासाठी सर्विस रस्त्यांचा विचार करून विशेष लेन तयार करण्याची मागणी – जनहितैसी इबादुल सिद्दीकी

– रस्त्यावरील लोकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, संपूर्ण भारतातील राष्ट्रीय वा राज्य महामार्गांवर दुचाकी वाहनांसाठी सर्विस रस्त्यांचा विस्तार करून विशेष लेन तयार केल्या पाहिजेत

– सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी

नागपूर :- सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी उर्फ जनहितैसी यांनी नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून देशभरात होणाऱ्या अपघातात लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गावर दुचाकी वाहनांसाठी सर्विस रस्ते वाढविण्याची मागणी केली. विशिष्ट लेन तयार करण्यासाठी सिद्दीकी यांनी त्यांना सांगितले की, भारतभर रस्ते वाहतुकीमध्ये चारचाकी वाहने आणि मोठे ट्रक, लॉरी आणि मोठे मोठे ट्रक चालत असल्याने दुचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांसह संपूर्ण कुटुंबच अपघाताचे बळी ठरतात. सन 2024 -25 मध्ये अपघातात एक लाख अस्सी हजारहून अधिक मृत्यू झाले असून यामध्ये 19 ते 35 वयोगटातील नवयुवक युवती यांचा 65 टक्के दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या सर्विस रस्त्यांचे विस्तारीकरण करणे आणि रस्त्यालगत दुचाकी वाहनांसाठी खास लेन स्वतंत्र लेन तयार करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना स्वतंत्रपणे वाहन चालवताना फायदा होणार आहे. तसेच महामार्गावर अपघात होण्याची शक्यता कमी आहे. लाखो लोकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे आहे सिद्दीकी यांनी गडकरींना सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली देशात महामार्गांचा उल्लेखनीय विकास झाला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरून प्रवास करणे आणखी सोपे झाले आहे. आता चांगल्या रस्त्यांमुळे वाहन कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचते. महामार्गाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रस्ता दुभाजकावर रोपे लावल्यास वाहनचालकांना फायदा होणार असल्याने वाहनांना दुसऱ्या टोकाकडून पडणाऱ्या प्रकाशाचा सामना करावा लागणार नाही. सार्वजनिक हितासाठी, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील विशेष लेन दुचाकी चालकांसाठी उपयुक्त ठरतील आणि लाखो लोकांचे प्राण वाचतील. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या सूचनेचे कौतुक करून आगामी काळात त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. इबादुल सिद्दीकी जनहितैसी सामाजिक कार्यकर्त्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles