राष्ट्रवादी नेते किशोरजी बेलसरे यांचा नेतृत्वात शरदचंद्र पवार यांना निवेदन.
कन्हान १४ : – नगरपरिषद कन्हान-पिपरी नविन इमारती च्या मुख्य द्वाराजवळ “अशोक स्तंभ ” व ” भारतीय संविधानाची प्रस्तावना ” स्थापित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा. शरदचंद्र पवार साहेबांना किशोर बेलसरे जिल्हा कार्या ध्यक्ष यांच्या नेतृत्वात कन्हान शहर राकाॅपा व्दारे बारा मती नगरपरिषद प्रमाणे कन्हान नगरपरिषद समोर मुख्य प्रवेश व्दारा जवळ स्थापित करण्याच्या मागणी चे निवेदन देण्यात आले. साहेबांनी महाराष्ट्र सरकार कडे प्रयत्न करण्या बाबद आश्वासन दिले.
नगरपरिषद कन्हान- पिपरी ची इमारत नुकतीच बांधण्यात येवुन करोडो रूपये खर्च करण्यात आलेले असुन ‘क’ वर्ग नगरपरिषद सन २०१४ साली आपले सरकार असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणी नुसार तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री उदयजी सामंत यांनी कन्हान ला मंजुर करून दिली. कन्हान ची लोकसंख्या ४५ हजार असुन एकुण मतदान २७ हजार च्या जवळपास आहे. कन्हान मध्ये अनुसुचित जाती ची संख्या ४४ % असुन ओबीसी व एस.टी. मिळुन ९०% च्या जवळ आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या संवि धानाला माननारा वर्ग बहुतेक सर्वच आहे. नविन प्रशा सकीय इमारत येथिल नागरीकांच्या शासकीय गरजां ची पुर्तता करणारी व महत्वपुर्ण सुविधा देणारी ठरणार आहे. ही इमारत केवळ प्रशासनाचे केंद्र नसुन लोकशा हीच्या सशक्त रचनेचे प्रतिक देखिल आहे. या पार्श्वभु मीवर या इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वारा जवळ “अशोक स्तंभ” व “भारतीय संविधान प्रस्तावना” यांचे स्थापत्य निर्माण करण्यात यावे, ही स्थापत्ये केवळ सौदर्य नव्हे तर भारतीय लोकशाही, संविधानिक मुल्ये आणि राष्ट्री य अस्मितांचे प्रतिनिधीत्व करणारी ठरेल व भविष्याती ल पिढ्यांमध्ये संविधान विषयीचा अभिमान, जागरूक ता आणि लोकशाही मुल्य रुजविण्यास मदत होईल. यास्तव पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेबांना किशोर बेलसरे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात कन्हान शहर राकाॅपा व्दारे बारामती नगरपरि षद प्रमाणे कन्हान नगरपरिषद समोर मुख्य प्रवेश व्दारा जवळ स्थापित करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. साहेबांनी महाराष्ट्र सरकार कडे प्रयत्न करण्या बाबद आश्वासन दिले.
नगरपरिषद कन्हान (पिपरी) नव्याने बांधण्यात असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वारा जवळ “अशोक स्तंभ” व “भारतीय संविधानाची प्रस्तावना” स्थापित करण्याची सार्वजनिक मागणी ब्लैक इंडियन पँथर्सचे रॉबिन निकोसे, नितीन मेश्राम, के.सी.एस लामा चॅरिटे बल ट्रस्टचे भदंत के सी एस लामा, राजे फाऊंडेशनचे केतन भिवगडे, जय मानवता संघटनाचे अजय चव्हाण, मांग गारुडी सामाजिक सांगठनचे नेवालाल पात्रे यांनी संयुक्तरित्या केली आहे. या मागणीला बळ देण्याकरिता कन्हान शहर राकाॅपा शहर अध्यक्ष सतिश बेलसरे, विधान सभा प्रमुख गणेश पानतावणे, प्रचार प्रमुख रॉबीन निकोसे, डाॅ. कमलेश शर्मा, महिला अध्यक्ष सूवणाॅ मानापुरे, शामराव मेश्राम, श्रीराम नांदूरकर आदीनी उपस्थित राहुन मागणी केली आहे. ही मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरी विकास, जिल्हाधिकारी नागपुर व मा. अनिलबाबु देशमुख माजी गृहमंत्री हयाना सुध्दा निवेदन देऊन केली आहे.




