खापा, १४ : नगर परिषद कार्यालय, खापा व गोदरेज फीडबॅक फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मंगळवारी (दि.१२) स्वातंत्रदिनिमित्य पर्यावरण संरक्षण जनजागृती आणि रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमीत्याने माझी वसुंधरा अभियान ६.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत “स्वच्छ खापा सुंदर खापा” रॅलीचे आयोजन करून लोकांना जागरूक करण्यात आले. तसेच नगर परिषद गांधी प्राथमिक शाळा मध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, राखी बनविणे स्पर्धा घेण्यात आली.
यानिमित्ताने गांधी शाळेत मुलांना “वेस्ट टू बेस्ट” या विषयावर कचऱ्यापासून उत्तम राखी कशी तयार करायची हे शिकवण्यात आले. तिरंगा राखी विद्यार्थ्यांद्वारे बनवून घेण्यात आली. फुले, पक्षी, बिंदी, बिया इत्यादींचे चित्र बनवून पर्यावरणपूरक राखी तयार करण्यात आली. ज्यामध्ये “कचऱ्यापासून कला” हा विषय स्वीकारण्यात आला होता. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि मुलांमध्ये सर्जनशील कला कौशल्य विचार विकसित करणे हा होता. नविन वस्ती येथे रैली काढून जनजागृती करण्यात आली. रैली दरम्यान राखी उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी न. प. खापाचे मुख्यधिकारी धनंजय सरनाईक, एचओडी अभिषेक सर, शहर समन्वयक राहुल बावनकुळे, स्वच्छता निरीक्षक प्रदीप परतेकी यांचेकडून महत्त्वाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. गोदरेज फीडबॅक फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र पासवान यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि गांधी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना बोंडे यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे शिक्षक राजेश बोकडे, शिक्षिका मंजुषा हेडाऊ, वैशाली कोल्हे, संगीता पाल, वंदना बागडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी हर घर तिरंगा अभियानाच्या समर्थनार्थ देशभक्तीपर गीते देखील सादर केली. नगर परिषद खापा या कार्यक्रमाच्या उपक्रमांद्वारे प्रत्येक घरापर्यंत जनजागृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत आहे. गोदरेज फीडबॅक फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या सुरक्षा तितरे, मीनाक्षी पराते, हर्षा पौणीकर, पूजा इटनकर यांनी विशेष सहकार्य केले.




