– नागपूर शहर वाहतूक विभागाच्या उपायुक्तांना निवेदन:
नागपूर :- गोळीबार चौक ते मारवाडी चौक तसेच गांधीबाग कपडा मार्केट परिसरात मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांच्या गैर सोयीबाबत नागपूर शहर वाहतूक विभागाच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. मोठ्या वाहनांचे रस्त्यालगत पार्किंग, माल चढविणे- उतरणे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने संबंधित वाहनांसाठी वेळ निश्चित करावी, अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी तसेच नियमित वाहतूक नियंत्रण व गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. मनोज जरेल यांच्या आयोजनात संतोष भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश ज्ञानेश्वर धोटे पाटील व आशिष खुबळकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी भारत ठाकरे, कुलवंत सिंग भामरा, तुषार फुले, अमरसिंग राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.





