spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ठाणे जिल्ह्यात जात प्राणपत्राच्या लाचप्रकरणी संबंधित उपसंचालक निलंबित

· विभागीय चौकशीसह जात वैधता प्रमाणपत्रांचीही सखोल पडताळणी होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके

मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील चरई येथील एमटीएनएल इमारतीमध्ये कार्यरत आदिवासी विकास विभागाच्या उपसंचालक (संशोधन), वर्ग-१ कार्यालयातील लाचप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. सचिवांच्या मान्यतेने त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीसाठी आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य राजू तोडसाम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री डॉ. वुईके बोलत होते. यावेळी सदस्य धर्माराव आत्राम यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांतील नस्तीची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याची तक्रार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने चरई येथील कार्यालयात सापळा रचून संबंधित उपसंचालकाला २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष अटक केली.

या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. सचिवांच्या मान्यतेने त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीसाठी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल; तसेच संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वी जारी केलेल्या जात पडताळणी व जात वैधता प्रमाणपत्रांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.