कन्हान : – श्री श्याम सरकार परिवार कन्हान यांच्या वतीने आयोजित ‘श्री श्याम झुला महोत्सव’ अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. हा भव्य कार्यक्रम रविवारी सायंकाळी ७.०० वाजता स्थानिक कुर्यात सदा मंगलम कार्यालय अशोक नगर, कन्हाय येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित श्याम भक्तांनी बाबा श्याम यांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तीचा आनंद लुटला.
श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर आयोजित या भजन संध्येत सुप्रसिद्ध भजन गायक मोनु अग्रवाल , विद्या धार्मिक, पौर्णिमा दीदी आणि त्यांच्या टीमने एकापेक्षा एक सरस भक्तीगीते व भजनांची सादरीकर णे करून संपुर्ण वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. भजनांच्या मधुर सुरांवर भाविक उशिरापर्यंत भक्तीत तल्लीन होऊन झूमताना दिसले. श्री खाटु श्याम मंदिरा साठी जमीन दान या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिर उभारणीची झालेली घोषणा होय. कॅप्टन सतीश किशोर बेलसरे यांच्या वतीने गहुहिवरा रोड येथील पाटील नगरमध्ये श्री खाटु श्याम मंदिराच्या भव्य बांधकामासाठी २५०० स्क्वेअर फूट जागा दान देण्यात आली. या घोषणेनंतर संपुर्ण हॉल ‘जय श्री श्याम’च्या जयघोषाने दुमदुमुन गेला आणि उपस्थितां नी कॅप्टन बेलसरे यांच्या या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वितेकरिता श्री श्याम सरकार परिवार कन्हानचे सतीश किशोर बेलसरे, महेश भरणे, सुर्यभान फरकाडे, नितेश भरणे, गणेश रामापुरे, शैलेश झेंडे, आकाश भगत, महावीर यादव, सुवर्णा रामापुरे, भूमि का भरणे, निलिमा फरकाडे, राधिका झेंडे, अस्मिता बेलसरे आदीसह पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.








