नागपूर :- मनपा ने कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा कार्यालयावर सील लावून हिटलरशाही चा परिचय दिला या घटनेचा निषेधार्थ आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने मनपाचा मस्तवाल अधिकारी यांच्या विरोधात संविधान चौक येथे आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलन करण्यात आले जेव्हा पर्यत मागणी पूर्ण होणार नाही तेव्हा पर्यत आंदोलन सुरूच राहील असा संकल्प करण्यात आला देवेंद्र बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनमा आयुक्त यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले शिष्टमंडळात प्रवीण आवळे, प्रा.रमेश दुपारे, प्रकाश कांबळे, हंसराज उरकुडे,जयदेव चिवंडे, के.टी.कांबळे उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले की प्रकरण न्यायप्रविष्ट असून सुध्दा कारवाई अवैध प्रकारे करण्यात आली, कार्यालयात ऐतिहासिक आंबेडकरी साहित्य ठेवले आहेत ते खराब होणाचा धोका आहे, असलेली थकबाकी किस्त प्रमाणे करून देण्यात यावी, ईत्यादी मागण्याचा समावेश करण्यात आले आहेत. आंदोलनात राजु कांबळे, रोहित पांडे. पवण वर्मा. नरेश खना, तन्हा नागपूरी, मनोहर इंगोले, रमेश डकाह, रमेश पांडुरंग दुपारे, गुडू रंगारी, सुभाष हाडके, गौतम बागडे, प्रकाश ठोसर सह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.








