spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धर्मराज विद्यालय कांद्री दहावीचा ९६.८९ निकाल

– विद्यालयातुन प्रथम कीर्ती पोटभरे ९०.६०%, द्वितीय भाग्यश्री दोडके ८९.४० %, तृतिय रीतिका छलिया ८९.२० %.   

कन्हान : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षा इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर केला असुन यात धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हानचा ९६.८९ % निकाल लागला असुन कीर्ती पोटभरे हिने ९०.६० % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम, भाग्यश्री दोडके ८९.४० % व्दितीय, तर रीतिका छलिया हिने ८९.२०% गुण प्राप्त करून तृतिय क्रमांक पटकाविला आहे.

धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान ता. पारशिवनी या माध्यमिक शाळेतुन एकुण १९३ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन १८७ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने विद्यालयाचा ९६.८९% % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ३५, ग्रेड १ – ८२, ग्रेड २- ५३, पास ग्रेड १७ असे एकुण १८७ विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन कीर्ती पोटभरे हिने ९०.६० % गुण प्राप्त करून विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. व्दितीय भाग्यश्री दोडके हिला ८९.४० %, तर रीतिका छलिया हिला ८९.२० % गुण प्राप्त करून तृतिय क्रमांक पटकाविला आहे. विद्यालयाचे संचालक खुशाल पाहुणे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक प्रकाश डुकरे, उपमुख्याध्यापक मोहन भेलकर, प्राध्यापक हरिश पोटभरे, शिक्षक विलास डाखोळे, अनिल मंगर आदी शिक्षकांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचे अभिनंदन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.