खाजगी कंत्राटदारासह अधिका-यांचे संगणम त इंटक नागपुर क्षेत्र अध्यक्ष बर्वे यांचा आरोप.
कन्हान ०२ : – डिझेल बाउझरमध्ये बिघाड झाल्याची संधी साधुन व वाहनात कमी डिझेल भरत अधिका-यांनी खाजगी कंत्राटदाराशी संगणमत करून अंदाजे ४ कोटी रूपयांचा डिझेल घोटाळा केल्याची बाब समोर आली आहे. ही घटना कामठी कोळसा खदान उपक्षेत्रा त उघडकीस आली आहे. मात्र ‘आपण सगळे भाउ भाउ, सगळी मलाई वाटुन खाउ’ या म्हणी प्रमाणे कनिष्ट अधिका-यांना वाचविण्याचे काम वरिष्ठ अधि कारी करीत असुन दोषीवर कारवाई करीत नाही, असा आरोप राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघ (इंटक) नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे यांनी दिलेल्या निवेदनातुन केला आहे.
वेकोलि कामठी उपक्षेत्र कोळसा ओपन कास्ट (एआयकेओसीएम) खानीच्या वाहनात डिझेल भर ण्याकरिता डिझेल बाउझर म्हणजे विशिष्ट टॅंकरचा वापर करण्यात येतो. मात्र कामठी उपक्षेत्राचे डिझेल बाउझर मध्ये २४ मे २०२३ रोजी बिघाड आल्यावर वेकोलिच्या खाजगी कंत्राटदार ईगल इन्फा या कंपनी च्या डिझेल बाउझर क्र. एमएच-३४ बीझेड २२०४ ने नियमांचे पूर्णत: उल्लंघन करून वेकोलि विभागी उत्ख नन यंत्रे, डंपर, डोझर आणि इतर मशिन मध्ये महिना भर डिझेल भरण्यात आले. विभागीय मशिन मध्ये डिझेल भरण्यात अनियमितता आढळुन आली. अधि का-यांनी कंत्राटदाराशी संगणमत करून कंत्राटदाराला लाभ पोहचवला, असा आरोप नरेष बर्वे यांनी केला आहे.
सर्वसाधारणपणे कोल इंडिया खाणी मध्ये विभा गीय यंत्र व वाहनांत डिझेल भरण्यासाठी खाजगी खाण कंपनीच्या ट्रंकर किंवा बाउझरचा वापर विशिष्ट मंजुरी किवा परिपत्रकाशिवाय करता येत नाही. आपा तकालिन परिस्थितीतही नियम व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. खाण कंत्राटदाराच्या डिझेल बाउझरचा वापर केल्याने डिझेल चोरीचा धोका असतो. विजिलेंस परिपत्रकाचा विचार केला तर वेको लिच्या कोणत्याही खाणीत विभागीय मशीन मध्ये डिझेल भरण्यासाठी खाण कंत्राटदरांच्या डिझेल बाउ झरचा वापर करण्यास ते कधीही परवानगी देत नाही. १६ मार्च २०२५ रोजी वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड कंपनी मध्ये वरील विषयांतर्गत राष्ट्रीय कोळसा खदान मजदुर संघ (इंटक) नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर महाव्यवस्थापक, नागपुर यांनी एक समिती स्थापन करून प्रकरणाचा तपास अहवाल वरिष्ठाना सादर केला. मात्र सदर चौक सी थातुरमाथुर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वरि ष्ठानी चालविला आहे.
विशेष म्हणजे २४ मे २०२३ ते २४ जून २०२३ या दरम्यान सुमारे एक महिना विभागीय डिझेल बाउ झर नादुरूस्त होता. परंतु चौकसी समितीने तपासात नमुद केले की, कंत्राटदाराचा बाउझर फक्त १५ दिवसां साठी आणि गोंडेगाव ओपन कास्ट खाणीचा बाउझर ७ दिवसांसाठी वापरण्यात आला. मात्र उर्वरित ८ ते ९ दिवस एआयकेडीओसीएम खाणीत डिझेल वितरणा साठी कोणता बाउझर वापरण्यात आला, हे चौकसी समितीने तपासात स्पष्ट केले नाही. विशेष म्हणजे खाण कंत्राटदार मेसर्स ईगल इन्फाचा डिझेल बाउझर वापरण्यासाठी सक्षम अधिका-यांची मान्यता घेण्यात आली नव्हती. ज्यावेळी मेसर्स ईगल इन्फाचा डिझेल बाउझर एआयकेडीओसीएम खाणीत वापरला जात होता, त्यावेळी एरिया रिजनल स्टोअर सिल्लेवाडा येथे ६००० लिटर क्षमतेचा एक नवीन डिझेल बाउझर उप लब्ध होता. परंतु एआयकेडीओसीएमने तो वापरण्या साठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
सक्षम अधिकार-याची परवानगी नाही
कंत्राटदाराच्या बाउझर द्वारे दररोज सरासरी १० हजार ते १२ हजार लिटर म्हणजेच सुमारे १० ते १२ लाख रूपये किंमतीचे डिझेल विभागीय मशिन मध्ये भरले जात होते. तसेच कंत्राटदाराच्या डिझेलवर चाल णारे यंत्र व वाहनही त्याच खाणीत कार्यरत होते. डिझे ल बाउझर मध्ये बिघाड झाल्यास नियमा प्रमाणे संबं धित वरिष्ट अधिका-यांच्या परवानगीनेच खासगीरित्या डिझेल भरण्याची व्यवस्था करायला हवी होती. तसेच या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करावा लागतो. मात्र या प्रकरणात कोणतीही परवानगी न घेता व सक्षम अधिका-याची नियुक्ती न करता ३ ते ४ कोटी रूपयांचे डिझेल विभागीय यंत्र व वाहनां मध्ये खासगी कंत्राटदारांमार्फत भरण्यात आले .
बाजुच्या खाणीत नवीन बाउझर असुनही टाळाटाळ
खाणीतील उत्पादनाशी संबंधित कोणतेही उपक रण बिघडले तर ते दोन-तीन दिवसांत दुरूस्त केले जाते. परंतु या प्रकरणात जाणुनबुजुन महिना भर विभागीय डिझेल बाउझर नादुरूस्त ठेवण्यात आले. जेणे करून मलाई लाटता येईल. आश्चर्य म्हणजे आज ही गोंडेगाव खाणीत एक नवीन डिझेल बाउझर वाप रात नाही. आज पर्यंत तो डिझेल बाउझर खाण कामा साठी वापरण्यात आला नाही, या मागचे कारण काय ? २०२३ मध्ये नागपुर क्षेत्राच्या खाणीसाठी वेकोलिने तो खरेदी केला होता. या संपुर्ण प्रकरणात सीएमडी आणि वेकोलिच्या सर्व संचालकांना तसेच विजिलेंस विभागाला तक्रार करण्यात आली आहे. परंतु आज पर्यंत कोणत्याही दोषी अधिका-यावर कारवाई करण्या त आली नाही. हा संपुर्ण भ्रष्टाचार तेथील उपक्षेत्रीय प्रबंधक शरद दीक्षित यांच्या देखरेखीखाली झाला आहे. वेकोलि व्यवस्थापन देखील दोषीना वाचविण्या च्या प्रयत्नात गुंतले आहे. या संबंधित झालेल्या गौड बंगालाची सखोल चौकसी करून संबंधित दोषी अधि का-यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघ (इंटक) नागपुर क्षेत्र नरेश बर्वे यांनी केली आहे.




