‘दिलखुलास’ मध्ये कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत

0
32

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ‘एल निनोचा कोकणातील शेतीवर होणारा प्रभाव आणि उपाययोजना’ या विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, २० जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत ‘न्यूज ऑन एआयआर’ (News On AIR) या मोबाईल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. निलेश पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

डॉ. मुठाळ यांनी एल निनो या हवामानविषयक घटनेचा कोकणातील शेतीवर होणारा परिणाम, पर्जन्यमानातील बदल, तापमानातील वाढ, पिकांच्या वाढीवर होणारे परिणाम तसेच कृषी क्षेत्रासमोरील संभाव्य आव्हाने याविषयी सविस्तर माहिती मुलाखतीत दिली आहे. याशिवाय बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांनी अवलंबावयाच्या पीक व्यवस्थापन पद्धती, जलसंधारण उपाययोजना, हवामान आधारित शेती नियोजन, हवामान अंदाजाचा प्रभावी वापर; तसेच जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

कोकणातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शाश्वत शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती या मुलाखतीतून मिळणार आहे.