Monday, March 9, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

येसंबा येथे शिवबा राजे फाउंडेशन तर्फे आयोजित साप्ताहिक शिवजयंती कार्यक्रमाचे सन्मान पत्राचे वितरण 

किशोर साहू, मौदा :- शिवबा राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे साप्ताहिक शिवजयंती कार्यक्रम नुकतेच राबिण्यात आले. या शिवजयंती मध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते , त्यामध्ये किल्ले बनविणे, वेशभूषा, चित्रकला स्पर्धा , गायन स्पर्धा , वक्तृत स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम पार पाडले.

या मध्ये विशेष करून ग्रा प येसंबा येथील अगंनवाडी लाभार्थी , प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी तसेच महिला वर्ग यांनी प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभाग नोंदविला होता , तर काही मुलं ,मुलींनी वेशभूषा स्पर्धा मध्ये सहभाग घेतला होता.

त्यानिमित्त त्यांना उपसरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते शिवबा राजे फाउंडेशन कडून मिळालेले सन्मान पत्र वितरित करण्यात आले व त्यांच्या कला , कौशल्य यांचे गुनगानही करण्यात आले.

याप्रसंगी अंगणवाडी सेविका माया चकोले, मदतनीस कांता गजभिये, प्रतिश चकोले, अश्विनी चकोले, निधी मेश्राम सह मान्यवर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com