Thursday, February 26, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

येरद येथील शांताई ज्युनियर कॉलेज परीक्षा केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

– बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याच्या सूचना

यवतमाळ :- इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मौजा येरद (ता. यवतमाळ) येथील शांताई ज्युनियर कॉलेजला अचानक भेट देत परीक्षा केंद्राची पाहणी केली. यवतमाळ शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या या केंद्रात आज बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना ही तपासणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू असलेल्या खोलीत जावून पाहणी केली तसेच नियुक्त पर्यवेक्षक शिक्षकांना कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याबाबत स्पष्ट व कडक सूचना दिल्या. परीक्षा वर्गात नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सतर्क राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

तपासणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत आहे का, याची प्रत्यक्ष पडताळणी केली. परीक्षा सुरु असताना कोणतेही कॉपीसारखा गैरप्रकार होत नाही ना, याची त्यांनी बारकाईने पाहणी केली.

आज पार पडत असलेल्या जीवशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला देण्यात आले. “सीसीटीव्ही फुटेजची छाननी करून काही अनुचित किंवा अनावश्यक बाबी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com