सरपंच रेणुका धामणे यांचे हस्ते ध्वजारोहण
टाकळघाट/१८ :- टाकळघाट पासून जवळपास १२ किमी अंतरावरील हळदगाव ग्रामपंचायत येथे स्वतंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनी ग्रा प सरपंच रेणुका दिगंबर धामणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनांतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशानुसार व सरपंच रेणुका दिगंबर धामणे यांचे पुढाकारणे गोकुळ अष्टमी तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकेत्तर सुवर्णा जयंती महोत्सव म्हणजेच ७५० व्या जयंती निमित्य संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा/मूर्ती पालखीमध्ये ठेऊन संपूर्ण गावभर टाळ, मृदूंग व भजन मंडळाचे उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. सदर कार्यक्रमाला ग्रा प सरपंच रेणुका धामणे,सचिव अनिता गोरटे,उपसरपंच दीपमाला गायकवाड, ग्रा प सदस्य माला मसराम,अरविंद मसराम, अतुल उईके, रमेश चौधरी, माजी सरपंच दिगंबर धामणे, भजन मंडळ हिरालाल मडावी, अंकुश दाते, नामदेव चौधरी, विलास नेताम, सविता दाते, वर्षा चौधरी, सत्यफुला लोणारे, लीलाधर लोणारे,कमळा दाते, बबिता मडावी, अनिता वरकडे,भारती लोणारे, बालू महल्ले, रंजना ठाकरे, दिलीप ठाकरे, चंद्रकला वाघाडे,दत्ताजी पिंपळे, दीपाली करडभाजने, इंदू करडभाजने, सर्व ग्रा प कर्मचारी व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.




