spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळच्या अध्यक्षपदी नागसेन सुखदेवें तर सचिव पदी सुमित गेडाम यांची बिनविरोध निवड

त्रीवार्षिक कार्यकारिणी जाहीर

कामठी ता प्र १८ :-आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या कामठी येथील सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळची त्रिवार्षिक कार्यकारिणी काल 15 ऑगस्ट ला निवडणूक निर्णय अधिकारी ऍड डी सी चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली  जाहीर करण्यात आली.ज्यामध्ये सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळ कामठी च्या अध्यक्षपदी  नागसेन सुखदेवें, उपाध्यक्षपदी राजन मेश्राम,सचिवपदी सुमित गेडाम,
सहसचिव पदी दिपंकर गणवीर, रोहित महिले,
कोषाध्यक्ष पदी  भिक्कु मेंढे,ओडिटर पदी एस एस सहारे गुरुजी व अशोक नगरकर यांची बिनविरोध निवड करीत कार्यकारिणीत नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आंबेडकरी चळवळीत सदैव सक्रिय राहून चळवळ कायम ठेवण्याच्या उद्देशाने सन 1967 मध्ये बाबू हरदास एल एन चौक, कामठी मोटर स्टँड चौकात सार्वजनिक भिम स्मूर्ती मंडळ ची स्थापना करण्यात आली.या सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळ कामठी च्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक कार्यात व आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग  नोंदवीत 6 डिसेंबर परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबर ला समाजप्रबोधन तसेच कव्वाली कार्यक्रम आयोजित करून डॉ  बाबासाहेब  आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात येते.हे कार्यक्रम अविरत  कायम ठेवत आजही ह्या चळवळीचा  वारसा कायम ठेवून मंडळाच्या बळकटीसाठी दरवर्षी 15 ऑगस्ट ला वार्षिक आमसभा घेण्यात येते.त्यानुसार तीन वर्षासाठी  कार्यकारिणी गठीत करण्यात येते त्यानुसार काल 15 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळ कामठी च्या कार्यालयात  निवडणूक निर्णय अधिकारी ऍड डी सी चहांदे यांच्या अध्यक्षतेखाली  बिनविरोध त्रिवार्षिक कार्यकारिणी गठीत करण्यात आली. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्यगण सिद्धार्थ गेडाम,महेंद्र कापसे, उमाकांत चिमनकर,सुनिल चव्हाण, उदास बन्सोड,जेता फुलझेले,कोमल लेंढारे, प्रमोद खोब्रागडे, राजेश गजभिये   तसेच  मंडळातील सक्रिय सभासद गोविंद वासे, माजी नगराध्यक्ष गुड्डूमानवटकर,
सुभाष सोमकुवर,वीरेंद्र मेश्राम,दिनेश पाटील,आशिष मेश्राम,आनंद गेडाम,विकास रंगारी,गीतेश सुखदेवें,रायभान गजभिये,मनोहर गणवीर,नीरज लोणारे,राजेश ढोके,विक्की दमके,राहुल वासे,अलंकार गजभिये,विलास वाघमारे,दिनू नागदेवे,रॉबिन रामटेके,आकाश झोडापे ,आयुष् खोब्रागडे,आदित्य गजभिये,रोशन डोंगरे आदी उपस्थित होते. संघटनेतील बिनविरोधी  नवनियुक्त कार्यकारीणीतील पदाधिकारी व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.