spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी – आदिती तटकरे

वाशिम :- राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना एक सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणींनी त्यांना मिळणारे सर्वच 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करु नये, त्यातील काही पैसे बचत करावेत, असा सल्ला तटकरेंनी दिला. हा सल्ला देताना त्यांनी एक किस्साही सांगितला. व्यापारी आम्हाला सतत विचारतात की लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार? कारण ज्यावेळी लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तेव्हा मार्केट गजबजलेलं असतं असं व्यापाऱ्यांनी सांगितल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या.

मंत्री आदिती तटकरे या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. जिल्ह्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यावेळी आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना हा सल्ला दिला.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?

आदिती तटकरे म्हणाल्या की, “आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुम्हाला मिळणारे 1500 रुपये सगळेच शॉपिंगवर खर्च करू नका. त्याच्यातील शे-पाचशे हे बचत गट किंवा इतर बँका, सोसायटीमध्ये ठेवा, त्याचा योग्य वापर करा. त्याचा पुढील कालावधीमध्ये तुम्हाला फायदा होईल.”

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, “शहरातील व्यापारी आम्हाला विचारतात की लाडक्या बहिणींचे पैसे कधी देणार? महिलांपेक्षा व्यापारीच याची जास्त चौकशी करतात. एकदा मी एका व्यापाऱ्याला विचारलं की, तुमच्या घरातील कुणी लाभार्थी आहे का? त्यावर तो व्यापारी म्हणाला की, ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं. त्यामुळेच आम्ही सारखं विचारतो की 1500 रुपये कधी मिळणार, असं तो व्यापारी म्हणाला.

Popular Articles