spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यापीठ आंतरमहाविद्यालय हॉलीबॉल स्पर्धेत सावनेरचे डॉ.हरिभाऊ आदमने अंतिम

खापा, वार्ताहर :- स्व.डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालय सावनेर येथे आयोजित विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष हॉली बॉल स्पर्धेत यजमान आदमने महाविद्यालय अंतिम सामना फेरीसाठी पात्र ठरले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ग्रामीण झोन म्हणून डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालय शारिरिक शिक्षण विभागाने हे आयोजन केले. या क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्नीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वीरेंद्र जुमडे उपस्थित होते. यावेळी आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धेचे प्रमुख अतिथी सावनेर येथिल पोलीस निरीक्षक दत्ता खानगुले, यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता मोहपा येथिल बॅ.शेषराव वानखेडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अलका थोडगे उपस्थित होत्या.

विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करणे ही आमच्या महाविद्यालयासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाचे प्र. कुलगुरू अखिलेश पेशवे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक संभाजी भोसले यांना मी धन्यवाद देतो.आमच्या महाविद्यालयातील क्रीडा विभागप्रमुख डॉ. दिनेशकुमार किमटा यांच्या नेतृत्वगुणांमुळे आम्हालाही संधी प्राप्त झाली त्यामुळे त्यांचीही मी अभिनंदन करतो असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे यांनी काढले.

ग्रामीण भागातील कौशल्य आधारित प्रतिभेला उत्तम आयाम देण्याचे कार्य क्रीडा करत असते. या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतून हा योग उत्तम साधला गेला आहे. असे विचार डॉ. अलका थोडगे यांनी व्यक्त केले.आंतर महाविद्यालय हॉलि्बॉल स्पर्धेतील विजेता संघ डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालय सावनेर यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे यांनी सन्मानपदक देऊन पुरस्कृत करण्यात आले. या स्पर्धेत एस.बी. जैन इंजिनियरिंग महाविद्यालय उपविजेतेस्थानी राहिला.कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख डॉ. मिलिंद साठे, इंदूताई मेमोरिअल फिजिकल इज्युकेशन, कॉलेज , नागपूर येथिल प्राचार्य डॉ.भरत मेहता तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीं मोठया संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अर्चना पाटील यांनी केले. तर आभार डॉ.विकास सावंत यांनी व्यक्त केले.

Popular Articles