Home Latest News खंडाळा (गांगनेर) येथील एनजीपी ॲग्रोटेक चे संचालक डॉ. निशांत बरबटे यांच्या सुप्रसिद्ध...

खंडाळा (गांगनेर) येथील एनजीपी ॲग्रोटेक चे संचालक डॉ. निशांत बरबटे यांच्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते विदर्भरत्न पुरस्काराने सन्मान 

0
32

किशोर साहू, मौदा :- रविवार (ता. 19 जुलै) रोजी रेसिल डॉट इन यांनी नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये कृषी क्षेत्रात उत्कृष्ट भरारी व शेतकऱ्यांना दिलेले दहा वर्ष सेवेबद्दल मौदा तालुक्यातील खंडाळा (गांगनेर ) येथील एनजीपी ॲग्रोटेकचे संचालक डॉ. निशांत बरबटे यांना सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते विदर्भ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. निशांत बरबटे हे ग्रामीण क्षेत्रातील असून शेतकऱ्यांबद्दल असलेली त्यांची तळमळ आणि सतत नव नवीन प्रयोग हे त्यांना काम करण्यात बळ देते.

शेतकऱ्यांना महागाईच्या युगामध्ये शेती नवीन तंत्रज्ञानाने कशी करायची आणि कसे सुष्म अन्नद्रव्य अवलंब करायचे आणि आपले पारंपरिक पिकाच्या व्यतिरिक्त नवीन पिक कशी घ्यायची, याबद्दल ते शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात व आपल्या कंपनीमध्ये असलेल्या प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांना माती परीक्षण, पाणी परीक्षण हे मोफत उपलब्ध करून देत असतात.ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये असलेल्या अचूक घटकांबद्दल माहिती होते आणि शेती करण्यास त्यांना त्याच्या फायदा होतो, हे विशेष!

याप्रसंगी विदर्भातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक उपस्थित होते.