इनर व्हील क्लब ऑफ नागपूरच्या नव्या अध्यक्षा डॉ पूजा साओजी तर मानद सचिव पद्मा देशराज यांची निवड

0
16

नागपूर :- इनर व्हील क्लब ऑफ नागपूरच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अमृतभवन, नॉर्थ अंबाझरी येथे उत्साहपूर्ण संपन्न झाला. या सोहळ्यात डॉ. पूजा साओजी यांनी अध्यक्षा, तर पद्मा देशराज यांनी मानद सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनर व्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन मनीषा चौधरी होत्या, तर व्ही.आय.ए – एल. ई. डब्ल्यू.च्या अध्यक्षा योगिता देशमुख या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी समाजसेवेत उल्लेखनीय योगदाना बद्दल डॉ. विभावरी दाणी यांचा डॉ. भाग्यलक्ष्मी राजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट महिला उद्योजिका म्हणून जुई मेशणकर यांना डॉ. हर्षा झारिया यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षा डॉ. पूजा साओजी, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट (IPP) सौ. सुप्रिया जोशी, उपाध्यक्षा  शर्मिला आनंद, मानद सचिव पद्मा देशराज, खजिनदार रुचिका वानखेडे, आय. एस. ओ. अंशू शुक्ला, सी.सी. डॉ. मीनल दवंडे, क्लब सल्लागार डॉ. भाग्यलक्ष्मी राजन, इनर व्हील इन्फॉर्मेशन कोऑर्डिनेटर प्रतिभा कुलकर्णी यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून अर्चना मराठे, डॉ. चारू धर्माधिकारी, डॉ. हर्षा झारिया, डॉ. प्रज्ञा गिजरे, सुषमा सातोकर आणि डॉ. वंदना बारस्कर यांची निवड करण्यात आली.इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट सुप्रिया जोशी यांनी २०२५-२६ या वर्षात क्लबने राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा सादर केला. नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. पूजा साओजी यांनी आपल्या मनोगतात सेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकी जपत क्लबचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. पी.डी.सी.मीना कुलकर्णी यांनी वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले. डिस्ट्रिक्ट चेअरमन मनीषा चौधरी यांनी महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करत जिल्ह्याची नवीन थीम “आयका” याविषयी माहिती दिली. तसेच योगिता देशमुख यांनी इंटरनॅशनल इनर व्हीलच्या “Reach and Inspire” व “Grow and Flourish” या संकल्पनांचे महत्त्व अधोरेखित करत समाजहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मराठे व प्रतिभा कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शर्मिला आनंद यांनी मानले.