नागपुर १५ : दिनांक १३/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक १४/०७/२०२५ चे ०५:००
वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये वृष्टी जैन, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय
पोलीस अधिकारी, उमरेड विभाग यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच पोलीस
स्टेशन उमरेड अंतर्गत बालाजी नगर, गरडापार, मंगळवारी पेठ, कावरा पेठ, नायडु बाजार, अभ्यंकर
चौक येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन
वृष्टी जैन यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज
गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विकेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष
घरझडती घेण्यात आली. तसेच हॉटेल लॉजेस ची तपासणी करण्यात आली. बायपास चौक
उमरेड येथे नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहनांची तपासणी करण्यात
आली. सदर कारवाईमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन सह दंगा नियत्रंण पथकाचे अंमलदार हजर
होते.
Home Latest News रात्र गस्त दरम्यान कोबींग ऑपरेशन राबवुन केले रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक आणि नाकाबंदी...



