spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बाल विज्ञान प्रदर्शनी पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी थेट तोंडलीत

किशोर साहू, मौदा :- उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 24 जानेवारी 2026 ला बाल विज्ञान प्रदर्शनी,पक्षी चित्र प्रदर्शनी, ऐतिहासिक नाणे प्रदर्शनी,मैदानी खेळ,आनंद मेळावा यांचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी बाल विज्ञान प्रदर्शनी आपले विविध प्रयोग सादर केले. प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी नवनवीन उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात असाच हा बहुआयामी कार्यक्रम बघण्यासाठी संपूर्ण शैक्षणिक अधिकारी टीम थेट तोंडली हजर झाली. हे बघून शाळेचे माजी विद्यार्थी गावचे सरपंच,उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सहशिक्षक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या प्रसंगी नागपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी निखिल भुयार, उपशिक्षणाधिकारी किरण चीनकुरे, तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत भुरे,मौदा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संकेत मरस्ककोल्हे, शिक्षण विस्तार अधिकारी रामेश्वर भक्तवर्ती ललिता चामट,धानोली केंद्राची केंद्रप्रमुख अरविंद भिवगडे अरोली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राऊत, तोंडली सरपंच दर्शना बागडे ,उपसरपंच रामपाल धांडे,अरोली सरपंचा रोशनी प्रशांत भुरे सह ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व गावातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांनी संग्रहित केलेली कवडीपासून ते रुपयापर्यंत नाण्यांचा प्रवास प्रत्यक्षरीत्या बघून सर्वांनी शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तसेच मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना पक्षांची ओळख व त्यांचा जीवनक्रम समजावा यासाठी आयोजित केलेली चित्र प्रदर्शनी जे चित्र त्यांनी स्वतःच्या हाताने रेखाटित करून रंगभरण केलेली होती हे बघून सर्वांकडे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडले. एका सुंदर बहुआयामी कार्यक्रम बघून इतर शाळांनीही याचा आदर्श घ्यावा असे उद्गार मान्यवरांनी काढले. अधिकाऱ्यांनी आनंद मेळाव्यातील पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती माता-पालक वर्ग यांची लेझीम नृत्य व गावकऱ्यांचा कार्यक्रमातील उत्स्फूर्त सहभाग बघून येथील विद्यार्थी नक्कीच उज्वल भविष्य घडू शकतील असा विश्वास किरण ताई चिनकुरे उपशिक्षणाधिकारी नागपूर यांनी व्यक्त केला.शाळेच्या या बहुआयामी कार्यक्रम व्यवस्थापन व आयोजन बघून मुख्याध्यापक अनुराधा धुर्डे व सहशिक्षक निलेश जाधव याचे निखिल भुयार शिक्षणाधिकारी नागपूर यांनी कौतुक केले.शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular Articles