spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उमरेडमध्ये वृद्ध महिलेची सोन्याची चेन लंपास; ‘चेन स्नॅचिंग’ची धक्कादायक घटना

 

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली; उमरेडमध्ये ‘चेन स्नॅचिंग’ची घटना

उमरेड १२ : उमरेड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त माहेरी आलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शीतल ब्रिजलाल अग्रहरी (वय ४०) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई त्रिवेणी अग्रहरी (वय ६५) या १० ऑगस्ट २०२५ रोजी राखीच्या निमित्ताने शिक्षक कॉलनीतील त्यांचे भाऊ सुभाष गुप्ता यांच्या घरी गेल्या होत्या. रात्री ९.३० च्या सुमारास जेवण झाल्यावर त्या घराबाहेर अंगणात फिरत होत्या. त्याचवेळी, काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोर थांबल्या.

त्यापैकी मागे बसलेल्या व्यक्तीने खाली उतरून त्रिवेणी अग्रहरी यांच्या गळ्यातील जुन्या पद्धतीची, साधारण एक ते दीड तोळ्याची सोन्याची चेन (गोफ) हिसकावली. या झटापटीत त्रिवेणी यांच्या उजव्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली. चोरटे तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच शीतल अग्रहरी यांनी उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या गोफची किंमत अंदाजे ६०,००० रुपये आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.