spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा येथे पद्मशेष सेवा मंडळाचा सार्वजनिक कढई महोत्सव उत्साहात संपन्न

 

खापा १२ : पद्मशेष सेवा मंडळ, खापा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य सार्वजनिक कढई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

या धार्मिक सोहळ्याला भाजपचे युवा मोर्चाचे  जिल्हाध्यक्ष पियुष बुरडे यांनीही आपल्या मित्रपरिवारासह उपस्थिती लावली. त्यांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या वेळी उपस्थित सर्व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्यामुळे कार्यक्रमाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले होते, ज्यामुळे सामूहिक भावनेचे दर्शन घडले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये गजानन ढगे, धनराज धांदे, रुपेश भाईमारे, आशिष भस्मे, सागर शेरेवार, जयंत लांजेवार, सचिन आखरे, प्रदीप बोरकर, दर्शन मासूरकर, धनराज मारोतकर, पंढरी लाड, काशिनाथ सुरकार, धीरज मलवे, विशाल गिरडकर, राहुल बावनकुळे, सतीश लांजेवार, जितेंद्र जर्वेकर, सतीश बुरडे, अक्षय सुपारे आणि हर्षल लांजेवार यांचा सहभाग होता.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.