सडक अर्जुनी :- येथील नगरपंचायत निवडणुकीला चार वर्षा चा. काळ लोटला असून पुढील एक वर्षाकरिता होणाऱ्या विषयी समिती सभापती पदाची निवडणूक आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी नगरपंचायत कार्यालय सडक अर्जुनी येथे पार पडली. वर्षभराकरिता सभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी शाहिस्ता शेख यांची तर आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून कमलादेवी अग्रवाल , पाणीपुरवठा व निसारण समिती सभापती पदी सायमा शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी वंदना डोंगरवार यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. पिठासीन अधिकारी म्हणून तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तसेच सडक अर्जुनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सारंग खांडेकर, प्रशासकीय अधिकारी युगलकुमार डडेमल उपस्थित होते. या निवडणुकीला नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. सर्व नगरपंचायत सदस्यांच्या सहकार्याने ही निवडणूक अविरोध पार पडली.
नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची निवडणूक संपन्न


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



