चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहे. २ डिसेम्बर ला मतदान तर ३ डिसेम्बर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. ४ नोव्हेम्बरपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपालिकेच्या निवडणूका घेण्यात येणार असून पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद तर १ नगरपंचायतीची होणार निवडणूक
बल्लारपूर नगरपरिषद
भद्रावती
वरोरा
ब्रह्मपुरी
घुग्गुस
राजुरा
गडचांदूर
चिमूर
मूल
नागभीड नगरपरिषद
भिसी नगरपंचायत
चंद्रपूर जिल्ह्यात १० नगरपरिषद तर ७ नगरपंचायती आहे, ६ नगरपंचायतीमध्ये वर्ष २०२२ मध्ये निवडणूक झाली आहे. निवडणूक झालेल्यामध्ये सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना, जिवती चा समावेश आहे.




