अतिक्रमण निर्मुलन कारवाई

0
30

नागपूर :- महानगरपालिका, धरमपेठ झोन क्र. ०२, अंतर्गत दि. 17/06/2026 रोजी केलेल्या अतिक्रमण कारवाई गोकुळपेठ मार्केट, चिल्ड्रन पार्क, व्हीआयपी रोड, फुटाळा तलाव, तेलंगखेडी रोड, व्हीएनआयटी रोड, धरमपेठ झोन अंतर्गत या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई आयुक्त मनपा नागपूर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाही मध्ये उपस्थित होते. कारवाई दरम्यान मोठया प्रमाणात सामान जप्त करण्यात आले व अतिक्रमण धारकांना ताकीद देण्यात आली की फुटपाथ मोकळे करावे. यापुढे अश्याच प्रकाराची धरमपेठ झोनच्या विविध परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल. पुन्हा पुन्हा त्याच जागी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.