Monday, March 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

निलज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त (तिथीनुसार) किशोरवयीन शाळकरी मुलांचे दानपट्ट्याचे उत्कृष्ट कौशल्याचे सादरीकरण 

किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता. ६ मार्च)ला मौदा तालुक्यातील सीमेवर स्थित पारशिवनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या निलज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार ) त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून त्यांच्या जीवनपटावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी किशोरवयीन शाळकरी मुलांचे दानपट्ट्याचे उत्कृष्ट कौशल्याचे सादरीकरण करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सुनील डोंगरे उपसरपंच रामचंद्र चकोले, उबाठा गटाचे रामटेक विधानसभा क्षेत्राचे सहसंपर्कप्रमुख रवींद्र चकोले सह समस्त ग्रामपंचायत सदस्य गण , शरद चकोले, ग्रामपंचायत कर्मचारी रोमन पाहूने ,मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. किशोरवयीन मुलांच्या हस्ते दांडपट्ट्याचे डोळ्यांचे पारडे फेटणारे कौशल्य सादरीकरण करण्याच्या यशस्वीतेसाठी पोलीस पाटील पुण्यराव चकोले ,टेकाडी येथील अनिकेत लिमजे यांनी खूप परिश्रम घेतले व दररोज निशुल्क दानपट्ट्याचे सराव घेणे सुरू असल्याचे पोलीस पाटील पुण्यराव चकोले यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com