spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कृषी दिनी उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकऱ्यांचा सत्कार

यवतमाळ :- हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंजेन्टा इंडिया प्रा.लि.च्या सीएसआर उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कृषी विभागाद्वारे आयोजित पीक स्पर्धेतील विजेते, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये पीक स्पर्धेतील विजेते चक्रधर साहेबराव पाटील रा. आरेगाव बु. ता. पुसद, ज्ञानेश्वर बबन घाटे रा. पाळोदी ता. पुसद, साहेबराव नारायणराव चौधरी रा. धानोरा खु. ता. दिग्रस, रमेश विठल म्याकलवार रा. विठोली ता.झरी जामणी, शरद धनराज देशकर रा.बोपापूर ता. झरी जामणी, विठल गुलाब भोयर रा.दाभा ता.झरी जामणी, काशीराम गोविंदराव भायमारे रा.कोपरा ता.आर्णी, मारोती सारा जुमनाके रा.खापरी ता. झरी जामणी, किसन दिगंबर भस्मे रा. झिरपूरवाडी ता. दिग्रस, धर्मराज आनंदराव येडमे रा. खापरी ता. झरी जामणी, चंद्रशेखर महादेव येडमे रा. खापरी ता. झरी जामणी, देवराव पांडुरंग मडावी रा.जुनोनी ता. झरी जामणी या शेतकऱ्यांसह प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याब‌द्दल नेर येथील विद्या अमोल नगराळे यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभ घेवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पार्वती शंकर देवकर गाव रा. कोपरा ता. आर्णी, पार्वताबाई नारायण पेदोर रा. माहुली ता. बाभुळगाव, वंदना गोरखनात शिवणे रा. ढवळसर (जांभोरा) ता. दारव्हा, यमुना रामकृष्ण घोडाम रा. झटाळा ता. घाटंजी, अर्चना पांडुरंग कन्नाके रा. निंभोरा ता. कळंब, मीना गजानन मडावी रा. तेलंग टाकळी ता. पांढरकवडा, मायाबाई शेषराव राजनकर रा. नगरवाडी ता. महागाव, प्रतिभा गंगाधर रामटेके रा. नरसाळा, ता.मारेगाव, अन्नपूर्णा सुरेश लंगोटे रा. आजंती ता. नेर, नवलू दिलीप घोसले रा.वाढोना ता. राळेगाव, वनिता संदीप मेटकर रा.कापरा ता. यवतमाळ, कमल महादेव टेकाम रा. उमरविहीर ता. राळेगाव, सुखदेव यादव लंबे रा. डोलंबावाडी ता. दिग्रस, कैलास लक्ष्मण ढेपे रा.डोंगरगाव ता. उमरखेड, दिलीप शंकर नगराळे रा. वल्हासा ता. झरी जामणी या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ड्रोण फवारणी तंत्रज्ञान व नॅनो खते प्रचारामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शुभम हिरालाल डवारे रा. खानगाव ता. यवतमाळ यांचाही सन्मान करण्यात आला.

Popular Articles