spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

28 आक्टोबर नागपुर येथे होणाऱ्या एल्गार मोर्च्यात जिल्हातील शेतकरी सहभागी होणार

गोंदिया :- जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, यासाठी 28 ऑक्टोबरला नागपूर येथे महा एल्गार मोर्चा बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होत असून शेतकरी शेतमजूर दिव्यांग भूमी कामगार यांच्या हक्कासाठी ही लढाई आहे. आपण या महा एल्गार मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी सहभागी होण्याचे आवाहन गोंदिया जिल्ह्यातील प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी यावेळी केली आहे. गावागावात त्यांनी महा एल्गार मोर्चाची प्रचार प्रसिद्धी करून प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी शेतकरी बांधवांना जनजागृती केले.महा एल्गार मोर्चासाठी आर्थिक मदत सुद्धा गावागावातून शेतकरी व नागरिकांनी केली आहे. तर येणाऱ्या 28 ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या एल्गार मोर्चाला यशस्वी करण्यात कराल अशी अपेक्षा प्रहार जनसक्ती पक्षाच्या वतीने केली आहे.

शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव 28 ऑक्टोबरला नागपूर होणाऱ्या एल्गार मोर्चात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांची ताकद सरकार दाखवावी कारण शेतकरी देशांचा खरा पोशिंदा आहे .त्याच्यावर अन्याय होत असेल तर मग या सरकारला धडा शिकवायला पाहिजे असे मत जिल्हाध्यक्षरत महेंद्र भांडारकर यांनी लक्ष व्यक्त केले.

Popular Articles