spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते रामदेवबाबा विद्यापीठ फीडर सेवा २८ ऑगस्टपासून

 

नागपूर २६ : महा मेट्रो आणि नागपूर महानगरपालिका (NMC) यांच्या संयुक्त प्रयत्नातून कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते रामदेवबाबा विद्यापीठ दरम्यान विशेष फीडर बस सेवा गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. ही सेवा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर ठरणार आहे. या सेवेच्या संदर्भात अलीकडेच “मेट्रो संवाद” उपक्रमांतर्गत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते रामदेवबाबा विद्यापीठ दरम्यान प्रत्यक्ष फीडर बस सेवा सुरू करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका आणि चलो टीमचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. राजेश पांडे (उपकुलपति, रामदेवबाबा विद्यापीठ), महेश मोरोने (संयुक्त महाव्यवस्थापक – मल्टी मोडल इंटीग्रेशन, महा मेट्रो), नीमसरकर (ऑपरेशन्स मॅनेजर, चलो टीम – मनपा बस सेवा) यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष फीडर बस सेवेसाठी मागणी केली होती. त्यांनी आपल्या प्रवासाशी संबंधित अडचणी आणि सूचना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो आणि मनपाने फीडर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिर
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ परिसरात तीन दिवसीय विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात महा कार्डचे वितरण तसेच मनपा बस पास उपलब्ध करून देण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून मेट्रो आणि फीडर बसमुळे त्यांचा प्रवास आता अधिक सोपा होणार आहे.

फीडर बस सेवेचा मार्ग कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते रामदेवबाबा विद्यापीठ असा असेल आणि ही सेवा विद्यार्थ्यांना मेट्रो स्टेशनपासून विद्यापीठापर्यंत सुरक्षित, वेळेवर आणि थेट प्रवासाची सुविधा प्रदान करणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.