रोजगार आणि महागाई लक्षात घेता घड्याळाला साथ देऊन आपल्या प्रगतीचा मार्ग शोधा – कल्याणी गोंडाणे

0
51

नागपूर :- राष्ट्रवादी काग्रेस पार्टी (अजित दादा गट) नागपुर महानगरपालिका प्रभाग क्रमांक. 5 (अ) मधून समाजसेविका म्हणून अधिकृत उमेदवार कल्याणी सनमकुमार गोंडाणे यांचे बोध चिन्ह घड्याळ यावर निवडणूक लढवित आहे. मला नागरिकांच्या आशीर्वादाने निवडुन आल्यावर प्रभागातील नागरिकांसाठी समाजातील गरिब होतकरू महिलांच्या कल्याणाकरिता कामगार योजना, संजय गांधी निराधार योजना, महिला युक्तिना रोजगारात्मक प्रशिक्षण लाडली बहना योजनाची मदत अश्या प्रकारच्या शासकिय योजनामधुन महिलांच्या कल्याणाकरिता मदत करण्याचे आश्वासन देत आहे. अनाथ, निराधार, निराश्रीत, एक पालक असल्याऱ्यांची मुले-मुली, दुर्धर आजारांनी पिडितांची मुले-मुली अश्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकासाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बालसंगोपन योजनेतुन शिक्षण व संगोपनासाठी अर्थसाहय मिळवुन देऊ. युवक – युवतिनां कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातुन रोजगार व विविध शासकिय योजनेअंतर्गत अर्थसाहय मिळवुन देवुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रभागातील संपुर्ण निवासी नागरिकांची आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, महिलांची सुरक्षा यांची काळजी घेण्यात येईल. महिला सशक्तीकरणास भर लहान मुलांचा शारीरिक विकासासाठी जलतरण व क्रिडा संकुल: तसेच सार्वजनिक जागा स्वच्छ, सुरक्षित व सुंदर परिसरनिर्मिती : महिला व युवक विकास कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी : स्वच्छ व आरोग्यदायी परिसर रोज कचरा उचल व नियमित साफसफाई करून दिली जाणार ! शिक्षण सुधारणा शाळा व अंगणवाड्यांच्या गुणवत्तेवर भर : आरोग्य सेवा मोफत तपासणी शिबिरे व योजनांची प्रभावी अंमलबजावणी : नागरिक तक्रार निवारण वेळेत व परिणामकारक उपाययोजना : पथदिवे – प्रत्येक गल्लीत पुर्ण क्षमतेने स्ट्रीट लाईट व्यवस्था : खुले व पारदर्शक प्रशासन नागरिकांशी सातत्याने थेट संवाद : पाणीपुरवठा 24 तास शुध्द, सुरक्षित आणि प्रमाणात पाणी रस्ते व गटारे -मजबुत रस्ते आणि योग्य गटार व्यवस्थापन : शासकिय योजना प्रत्येक वस्तीत शासकिय योजना मदत कक्षाची स्थापना : ग्रथालय लायब्ररीची स्थापना : लाडकी बहिण योजना लाडकी बहिन योजनेचे 2100 रू होणे करिता सर्वोतपरी प्रयत्न केला जाणार आहे. घडयाळ चिन्हावर बहुमताने विजय करून द्यावे. अशी नम्र विनंती केली आहे.