spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

येरखेडा नगर पंचायत मध्ये संपन्न झाले ध्वजारोहण 

 

नागपूर १९ : नगर पंचायत येरखेडा येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम अमर हांडा प्रशासक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकारी व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.
हर घर झेंडा या उपक्रमात घेतलेल्या विविध स्पर्धा निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,यात सहभागी होणारे तसेच गुणानुक्रम प्राप्त शहरातील प्रमुख ५ शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी प्रशासक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. तसेच या वेळी स्वच्छता विभागात कार्यरत सर्व सफाई कामगार व सुपरवाइसर यांचा सत्कार करण्यात आला
 समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थितांच्या स्वागताने झाले.
प्रशासक यांनी यावेळी आजच्या दिनाचे औचित्य साधत देशप्रेम व आपली देशाप्रती आपली भूमिका व जबाबदारी याविषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी,महिला बचतगटातील महिला, कार्यालयीन सर्व कर्मचारी यांचा सहभाग होता.
कार्यक्रम यशस्वी ते करिता कार्यालयातील कार्यरत मनोज कावळे प्रशासकीय अधिकारी, राहुल घुगे कर व प्रशासकीय अधिकारी, धर्मेंद्र गजभिये सहा.प्रकल्प अधिकारी लीना कडम्बे शहर समन्वयक, मोहित मेश्राम,अभियंता व सुशील धांडे,जॉनी वंजारी ,नीता पारधी तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी परिश्रम घेतले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.