किशोर साहू,मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही कोदामेंढी- अरोली जि प व रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील गट ग्रा पं तोंडली अंतर्गत येणाऱ्या तोंडली येथे दोन दिवसीय २१ व २२ नोव्हेंबरला मंडई महोत्सवाचे आयोजन थाटात करण्यात आले होते. गावातील मंडई महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच खासदारांनी हजेरी लावली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे तोंडली येथील मंडई महोत्सवाला उपस्थित होते. मंडई महोत्सवाच्या माध्यमातून जातीय सलोखा अबाधित राखला जातो व गावातील विविध गटातील आपापसातील मतभेद दूर होऊन एकात्मतेची भावना जोपासली जाते, असे मार्गदर्शन करताना खासदार शामकुमार बर्वे यांनी सांगितले. त्यामुळे गावागावात दरवर्षी मंडई महोत्सवाचे आयोजन नियमित होत रहावे, यानिमित्ताने रोजगार निर्मितीही होत असते, असेही ते पुढे म्हणाले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष रमेश कारेमोरे, सामाजिक कार्यकर्ते अभय रेड्डी, माजी सरपंच मधुकर सेलोकर, गट ग्रा पं तोंडली ग्रा पं सदस्या आकांक्षा योगेश बुरडे,माजी ग्रा पं सदस्य रामकृष्ण आस्वले, आयोजक प्रकाश सपाटे, अध्यक्ष भास्कर ठवकर, उपाध्यक्ष प्रवीण सेलोकर, सचिव शेखर गाढवे, सहसाचिव मुरलीधर कनोजे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद अतकरी, जीवन उके , योगेश बुरडे, राजु शेंडे, महादेव मोहतुरे ,परमेश्वर तिजारे,कैलाश तिजारे, गौरीशंकर तिजारे , मंडळाचे सर्व सदस्य , काँग्रेस चे पदाधिकारी व समस्त तोंडली ग्रामवासी उपस्थित होते.






