spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री येथे पक्षप्रवेश संपन्न

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे स्वागत

मुंबई १४ : काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शेकडो समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटील यांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी  पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ.सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. सत्यजीत देशमुख, आ. प्रवीण दरेकर, माजी आ. संग्राम थोपटे, माजी आ. संजय जगताप, सांगली शहराध्यक्ष प्रकाश ढंग, जन सुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, वर्षानुवर्षे विकासाचा ध्यास घेऊन निष्ठेने सहकार क्षेत्रासाठी  झटणाऱ्या पृथ्वीराज पाटील, यांचा  प्रवेश हा भाजपासाठी आनंदाचा क्षण आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपाच्या विकासधोरणावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सखोल चर्चा केली. पृथ्वीराज पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत पालकमंत्री म्हणून मला निर्देश दिले आहेत.

 सांगलीच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे  पाटील यांनी सांगितले. शुद्ध मुबलक पाणीपुरवठा, ॲग्रोटेक हबमधून विकास व्हावा, कार्गो विमानतळ म्हणून मान्यता द्यावी, पर्यटन विकास आणि गुंठेवारीचा प्रश्न सोडवावा अशा प्रमुख पाच मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  सादर केल्याचेही  ते म्हणाले. यापुढे पूर्ण ताकदीने भाजपासाठी काम करेन असा शब्द त्यांनी दिला.

कुपवाड, मिरज आणि सांगली शहर विधानसभा मतदारसंघात येणा-या 14 गावांतील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी तसेच  उपसरपंच, माजी सरपंच यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यामध्ये  आप्पासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. प्रताप पाटील, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र मेथे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, प्रकाश व्हनखंडे, माजी नगरसेविका कांचन तुपे, भारती भगत, सांगली दक्षिण चे शहराध्यक्ष बिपीन कदम, कुपवाड शहर अध्यक्ष सनी धोतरे, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस आनंदराव पाटील, सुनील मोहिते आदींचा समावेश आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.