spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

 

रांची ४ : झारखंडच्या राजकारणातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) चे संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर ही दुःखद बातमी दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आदरणीय दिशम गुरुजी आपल्याला सोडून गेले आहेत. आज मी शून्य झालो.”

शिबू सोरेन यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय होता. एका सामान्य कुटुंबातून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

Popular Articles