spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमहिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, पतीच निघाला सूत्रधार

अमरावती ४ : अमरावती येथील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे-तायडे यांच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशा यांची हत्या त्यांच्याच पतीने, राहुल तायडेने, सुपारी देऊन घडवून आणल्याचं उघड झालं आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी आशा धुळे यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला राहुलने हा चोरीचा प्रकार असल्याचं भासवलं. पण पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान राहुलचं गेल्या ४-५ वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचं निष्पन्न झालं. यावरून आशा आणि राहुल यांच्यात सतत वाद होत असत, आणि याआधीही आशा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

याच प्रेमसंबंधातून राहुलने पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्याने आपल्या दोन मित्रांना ५ लाखांची सुपारी दिली होती. हत्येच्या दिवशी राहुलने त्यांच्या मदतीने आशा यांचा खून केला. घटनेनंतर मारेकऱ्यांनी २५,००० रुपये घेतले आणि ते पळून गेले.

पोलिसांनी राहुल तायडेला अटक केली असून, फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. राहुल आणि आशा यांचा प्रेमविवाह झाला होता, पण राहुलच्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. आता या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

Popular Articles