माजी खासदार जतीरामजी बर्वे यांची १०७ वी जयंती उद्या 

0
35

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- माजी खासदार स्व. जतीरामजी बर्वे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता झिरो माइल नागपुर येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती सोहळ्यात स्थानिक नागरिकांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ति चंद्रलाल मेश्राम, खासदार शामकुमार बर्वे, आमदार नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन सहकारी संस्था व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळा यशस्वी करावा असे आवाहन आयोजक प्रभाकर मांढरे, धनराज कनूरके, बबलू दुधबर्वे, सुरेश सिवरकर, दिलीप पारसे, वनिता नगरे यांनी केले आहे.