spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर – निमखेडा जि प सर्कल मधील विविध विकासकामे करण्यासाठी माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले निवेदन 

किशोर साहू, मौदा ,ता. ५ :- शनिवार ( दि. 3 जानेवारी) ला जनसंपर्क कार्यालय कोराडी येथे पालकमंत्री नागपुर तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुड़े यांची भेट घेऊन चाचेर-नीमखेड़ा सर्कल मधील विविध विकासकामे संदर्भात चर्चा केली असता सर्कल मधील ज़ुडपी जंगल जमिनीवर बांधकाम केलेल्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे,चाचेर बाजार चौक ते स्मशान गेट पर्यंत सीमेंट रोड व दोन्ही साइड ला नाली बांधकाम करिता 3 कोटी लक्ष ची निधि उपलब्ध करुन दयावी अशी मागणीचे निवेदन माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांनी दिले.

येणाऱ्या बजट मधे सर्व कामे मंजूर करुन देतो व सर्कल चा प्रत्येक गावातील अतिक्रमीत झुडपी जंगलच्या जागेवर बांधकाम केलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून , योग्य चौकशी करून सर्वाना पट्टे लवकरच देऊ असे आश्वासन याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बरबटे यांना दिले. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय वाघमारे, ग्रामपंचायत आष्टी (नवेगाव)चे माजी उपसरपंच नंदू मेहर, उपस्थित होते.

Popular Articles