spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ठाण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; पालकांत भीतीचे वातावरण

 

ठाणे ५ – ठाणे जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

या घटनेची पार्श्वभूमी पाहता, काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चौथीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आता पुन्हा अशाच स्वरूपातील घटना घडल्याने पालकांमध्ये भीती, संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

शाळा म्हणजे सुरक्षिततेचं स्थान मानलं जातं, मात्र सतत अशा घटना घडत असल्याने शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांकडून घटनेचा कसून तपास सुरू असून, संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

@filephoto

Popular Articles