नगर परिषद कार्यालय येथे मोफत आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन

0
28

खापा, वार्ताहर :- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आयुष्मान कार्ड तीन तीन दिवसीय शिबिराचे आयोजन नगर परिषद कार्यालय येथे करण्यात आले आहे. शिक्षण समितीच्या सभापती अंजली आनंद मेनकुदळे आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती वैशाली चंद्रकांत लिखार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सुमारे ३०० आयुष्मान कार्ड बनवण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, नगरसेवक रवी परतेती, प्रशांत तुमाने, निखिल आष्टनकर, किशोर आष्टनकर, पुष्पेंद्र (मुन्ना) शर्मा, नगरसेविका रोशनी शेखर डेरे, निशा राजू कठौते, शोभा कारणकर तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. प्रमोद लकडकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. सुनील चौहान यांनी आभार व्यक्त केले. आयोजकांनी नागरिकांना या शिबिराचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले.