spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नंदापुर येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा

खापा, वार्ताहर :- सावनेर कृषी विभागाच्या वतीने नंदापुर येथील अंगणवाडी कार्यालयात २२ मे रोजी खरीप हंगामपूर्व नियोजनाबाबत शेतकरी सभा झाली. या सभेत विविध शासकीय योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान तसेच आगामी खरीप हंगामाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सावनेर तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी महाडीबीटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, महविस्तार अॅप, अँग्रीस्टॅग प्रणाली तसेच निनोच्या संभाव्य परिणामाविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय शिवारफेरीव्दारे जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले. सभे दरम्यान सोयाबीन व तुर बियाण्याच्या उगवणक्षमता तपासण्याचे प्रत्येक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने कृषी अधिकारी सोमनाथ साठे, उपकृषी अधिकारी रोशन डंभारे, खापा मंडळ कृषी अधिकारी विलास भिसे, कृषी सहाय्यक पुजा इंगळे, पुरुषोत्तम नागपुरकर, तुलशिदास पाटील, दिवाकर ढोके, चंदशेखर ढोबळे, नथ्थु ढोबळे, गंगाधर वानखडे, वासुदेव मोरेकर, विनायक ढोबळे, करण पाटील, नंदकिशोर धोटे, जितु ठाकरे, हेमराज गोंडुले, कमलाकर चौधरी, धोंडबा मोजनकर, कमला नागपुरकर यांच्या सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.