Home Latest News नंदापुर येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा

नंदापुर येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा

0

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> सावनेर कृषी विभागाच्या वतीने नंदापुर येथील अंगणवाडी कार्यालयात २२ मे रोजी खरीप हंगामपूर्व नियोजनाबाबत शेतकरी सभा झाली&period; या सभेत विविध शासकीय योजना&comma; आधुनिक शेती तंत्रज्ञान तसेच आगामी खरीप हंगामाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>सावनेर तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी महाडीबीटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली&period; त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना&comma; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना&comma; महविस्तार अॅप&comma; अँग्रीस्टॅग प्रणाली तसेच निनोच्या संभाव्य परिणामाविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले&period; याशिवाय शिवारफेरीव्दारे जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले&comma; असल्याचे त्यांनी सांगितले&period; सभे दरम्यान सोयाबीन व तुर बियाण्याच्या उगवणक्षमता तपासण्याचे प्रत्येक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी प्रामुख्याने कृषी अधिकारी सोमनाथ साठे&comma; उपकृषी अधिकारी रोशन डंभारे&comma; खापा मंडळ कृषी अधिकारी विलास भिसे&comma; कृषी सहाय्यक पुजा इंगळे&comma; पुरुषोत्तम नागपुरकर&comma; तुलशिदास पाटील&comma; दिवाकर ढोके&comma; चंदशेखर ढोबळे&comma; नथ्थु ढोबळे&comma; गंगाधर वानखडे&comma; वासुदेव मोरेकर&comma; विनायक ढोबळे&comma; करण पाटील&comma; नंदकिशोर धोटे&comma; जितु ठाकरे&comma; हेमराज गोंडुले&comma; कमलाकर चौधरी&comma; धोंडबा मोजनकर&comma; कमला नागपुरकर यांच्या सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version