Home Latest News बांबू अर्थव्यवस्थेला चालना देऊन शाश्वत विकास साधावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

बांबू अर्थव्यवस्थेला चालना देऊन शाश्वत विकास साधावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> बांबूचा वापर केवळ पारंपरिक क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञान&comma; संशोधन आणि व्यापारीकरणाच्या माध्यमातून त्याचा विस्तार करणे आवश्यक आहे&period; प्लास्टिकला पर्याय&comma; रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनासाठी बांबू महत्त्वाची भूमिका बजावू शकतो&period; त्यामुळे बांबू उत्पादनासोबतच त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्यावर भर द्यावा&comma; असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;बांबू अर्थव्यवस्था आणि शाश्वतता परिषद २०२६’चे आयोजन मुंबईतील हॉटेल द वेस्टिन&comma; पवई येथे करण्यात आले होते&period; त्यावेळी ते बोलत होते&period; जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने आयोजित या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बांबूच्या रोपाला पाणी देऊन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आले&period; परिषदेत दिवसभर विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून&comma; हवामान बदल&comma; शाश्वत विकास&comma; रोजगारनिर्मिती तसेच बांबू उद्योगातील आर्थिक संधी यावर तज्ज्ञांनी विचार मांडले&period; या परिषदेस १३ राज्यांतील बांबू उत्पादक शेतकरी&comma; उद्योजक व प्रतिनिधी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-66563 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;&OpenCurlyQuote;बांबूअर्थव्यवस्थाआणिशाश्वततापरिषद२०२६1&lowbar;copy&lowbar;800x495&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"494" &sol;><&sol;p>&NewLine;<p>बांबू हा भारताच्या सामाजिक&comma; सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाशी जोडलेला नैसर्गिक स्रोत आहे&period; बांबूपासून दागिने&comma; कप&comma; सजावटीच्या तसेच घरगुती वापराच्या विविध वस्तू तयार होत आहेत&period; संशोधन&comma; आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापारीकरणाच्या माध्यमातून बांबूला स्वस्त&comma; टिकाऊ आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध पर्याय बनविण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सौरऊर्जा&comma; पवनऊर्जा आणि हरित हायड्रोजनसोबत बांबूचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहू शकते&period; पर्यावरण संरक्षण&comma; आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगती यांचा समतोल साधणारा शाश्वत विकास ही सामूहिक जबाबदारी आहे&comma; असेही राज्यपालांनी यावेळी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जोडधंदा -मंत्री भरत गोगावले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बांबू लागवडीला चालना देऊन शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती तसेच बांबू आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे&comma; असे रोजगार हमी योजना&comma; फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्रात बांबू लागवडीसाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जात असून&comma; लागवडीनंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठीही सहकार्य केले जाते&period; बांबूपासून विविध वस्तू व उद्योग उभारण्याची मोठी क्षमता असून&comma; या क्षेत्रासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल&period; शेतीसोबत बांबूची लागवड हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त जोडधंदा ठरू शकतो&comma; असे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-66564 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;&OpenCurlyQuote;बांबूअर्थव्यवस्थाआणिशाश्वततापरिषद२०२६4&lowbar;copy&lowbar;800x545&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"545" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>बांबूच्या माध्यमातून हरित अर्थव्यवस्थेला चालना &&num;8211&semi; पाशा पटेल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्रात बांबू लागवडीचा विस्तार करून हरित क्षेत्र वाढविण्यासोबतच रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देता येईल&period; जागतिक तापमानवाढ व हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर बांबू हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो&comma; असे महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले&period; राज्यातील ३०० कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमातही बांबूची महत्त्वपूर्ण भूमिका राहू शकते&comma; असे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या परिषदेस गुजरातचे जलसंपदा व पाणीपुरवठा राज्यमंत्री &lpar;स्वतंत्र प्रभार&rpar; ईश्वरसिंह पटेल&comma; केपी ग्रुप सुरतचे संस्थापक व अध्यक्ष डॉ&period; फारुक पटेल&comma; मौलाना जुझैफा वस्तानवी&comma; टेफ्लाजचे संचालक आदिल सिंग यांच्यासह बांबू उद्योगातील मान्यवर&comma; शेतकरी व उद्योजक उपस्थित होते&period; कार्यक्रमाच्या शेवटी आदिल सिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version