Home Latest News ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने निनादले शहर; चंद्रपूरकरांच्या भक्तीला आ. सुधीर मुनगंटीवार यांची...

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने निनादले शहर; चंद्रपूरकरांच्या भक्तीला आ. सुधीर मुनगंटीवार यांची सलामी

0

<p><strong>&&num;8211&semi; आ&period; सुधीर मुनगंटीवार यांनी गणेश विसर्जन सोहळ्यातील भक्तिमय वातावरण आणि शिस्तबद्धतेचे केले कौतुक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; महानगरपालिका&comma; पोलिस प्रशासन&comma; गणेश मंडळे आणि नागरिकांच्या समन्वयातून विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; हजारो भाविकांनी भक्तिभाव&comma; उत्साह आणि शिस्तीने आपल्या लाडक्या बाप्पाला दिला निरोप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> &OpenCurlyQuote;गणपती बाप्पा मोरया&comma; पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले&period; ढोल-ताशांचा गजर&comma;देखावे&comma; गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग आणि बाप्पाच्या निरोपावेळी दाटून आलेले भावनिक क्षण यामुळे गणेश विसर्जन सोहळ्याला भक्ती आणि उत्साहाचे अनोखे वैभव लाभले&period; हजारो गणेशभक्तांनी शांततेत आणि शिस्तीत आपल्या लाडक्या बाप्पाला श्रद्धापूर्वक निरोप दिला&period; चंद्रपूरचा गणेश विसर्जन सोहळा हा भक्ती&comma; शिस्त आणि सामाजिक एकतेचा सुंदर आविष्कार ठरला&comma; असे प्रतिपादन राज्याचे माजी वने&comma; सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले&period; विसर्जन सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन&comma; पोलिस दल&comma; गणेश मंडळे&comma; कार्यकर्ते आणि चंद्रपूरकर नागरिकांचे विशेष कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;<p>चंद्रपूर शहरातील भव्य गणेश विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला&period; हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या विसर्जन मिरवणुकीत आमदार सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले&period; विविध गणेश मंडळांना भेट देत त्यांनी गणेशभक्तांशी संवाद साधला&comma; त्यांना शुभेच्छा दिल्या&period; बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख&comma; समाधान आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली&period; शहराच्या विविध भागांतून उमटणाऱ्या &OpenCurlyQuote;गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने वातावरणात भक्तीचा उत्साह संचारला&period;<img class&equals;"alignnone wp-image-66556 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;WhatsAppImage2026-09-26at3&period;25&period;29PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>गणेश भक्तांनी अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला&period; विविध गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे&comma;मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिक&comma; आकर्षक ढोल-ताशांचा निनाद आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विसर्जन सोहळ्याला विशेष रंगत आली&period; &OpenCurlyQuote;गणपती बाप्पा मोरया&comma; पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात निरोपाची हुरहूर आणि पुढील वर्षी पुन्हा बाप्पाच्या स्वागताची आस एकवटली होती&period; डोळ्यांत विरहाचे अश्रू&comma; मनात भक्तीचा भाव आणि ओठांवर बाप्पाचा जयघोष&comma; अशा भावस्पर्शी वातावरणात हजारो भाविकांनी गणरायाला निरोप दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा&comma; चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर &comma;डॉ&period; मंगेश गुलवाडे&comma; ब्रिजभूषण पाजारे&comma; राम लाखिया&comma; सय्यद चांद पाशा&comma; प्रकाश धारणे&comma; पुरुषोत्तम सहारे&comma; रवी लोणकर&comma; जयश्री जुमडे&comma;छबुताई वैरागडे&comma;नम्रता ठेमस्कर&comma;सविता सरकार&comma;सुनीता जयस्वाल&comma;शिला चव्हाण&comma;चंद्रकला सोयाम&comma; कल्पना बगुलकर&comma;रेणू घोडेस्वार&comma;सुप्रिया सरकार&comma;वंदना संतोषवार&comma;माया उईके&comma; शितल आत्राम&comma;संगीता बावणे&comma;मोनिशा महातव&comma; मनीषा ठुणेकर&comma; काशिनाथ सिंह&comma; रवीश सिंह&comma; श्रीनिवास जंगम&comma; अजय सरकार&comma; अनिल डोंगरे&comma; प्रलय सरकार&comma; महेंद्र जुमळे&comma; आकाश मस्के&comma; विकी लाडसे&comma; सूर्यकांत कुचनवार&comma; सोहम बुटले&comma; प्रमोद शिरसागर&comma; सत्यम गाणार&comma; श्रीनिवास कंदकुरी&comma; होमेश्वर नंदनवार&comma; बाळू कोलनकर&comma;प्रवीण बर्डे&comma; अनिल अडूर&comma; सचिन यामावार&comma; मोनीश आस्वानी तसेच भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर व ग्रामीणचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-66557 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;WhatsAppImage2026-09-26at3&period;25&period;28PM2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आ&period; मुनगंटीवार यांनी विविध गणेश मंडळांना भेट देऊन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला&period; गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे तसेच विसर्जन सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी कौतुक केले&period; शांतता&comma; शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या पार्श्वभूमीवर आ&period; सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका&comma; पोलिस प्रशासन&comma; गणेश मंडळांचे पदाधिकारी&comma; कार्यकर्ते आणि सर्व गणेशभक्तांचे अभिनंदन करताना सांगितले की&comma;गणरायाला निरोप देतानाही चंद्रपूरकरांनी भक्तीबरोबरच शिस्त&comma; संयम आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली&period; प्रशासन&comma; गणेश मंडळे&comma; कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समन्वयातून पार पडलेला हा विसर्जन सोहळा चंद्रपूरच्या सांस्कृतिक समृद्धी&comma; सामाजिक एकता आणि भक्तीभावाचे दर्शन घडवणारा ठरला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version