Home Latest News महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता; भव्य मिरवणुकीने गणरायास निरोप

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता; भव्य मिरवणुकीने गणरायास निरोप

0

<p><strong>&&num;8211&semi; दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात १४ सप्टेंबरपासून उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची काल दिमाखात सांगता झाली&period; रात्री श्री गणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले&period; या उत्सवादरम्यान राजधानी दिल्लीमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे परिपूर्ण दर्शन घडले&period;<&sol;p>&NewLine;<p>विसर्जनाच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात जुन्या महाराष्ट्र सदनातून झाली&period; विसर्जनापूर्वी निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली&period; आरतीनंतर झांज पथक&comma; ढोल-ताशांच्या गजरात श्रींच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली&period; &OpenCurlyQuote;गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जुन्या महाराष्ट्र सदनातून नव्या महाराष्ट्र सदनापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत दिल्लीतील नागरिक&comma; विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले&period; ढोल-ताशांच्या तालावर उत्साहाने सहभागी झालेल्या भक्तांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला&period; मिरवणूक महाराष्ट्र सदनात पोहोचल्यानंतर गणेशभक्तांनी श्रींचे दर्शन घेतले आणि विहित धार्मिक विधींनुसार श्रींच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-66552 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;WhatsAppImage2026-09-26at7&period;26&period;05PM&lowbar;copy&lowbar;800x450&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"450" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या बारा दिवसांच्या उत्सवात दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६&period;१५ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली&period; १४ सप्टेंबर रोजी श्रींची प्राणप्रतिष्ठा&comma; आगमन मिरवणूक आणि भजनाचा कार्यक्रम झाला&period; याशिवाय आकाशवाणी रंगभवन तसेच जुन्या महाराष्ट्र सदनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले&period; प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांचे &OpenCurlyQuote;पुन्हा सही रे सही’ हे नाटक&comma; नितीन सरकटे हंसराज यांची लाईव्ह कॉन्सर्ट&comma; वैभव जोशी व संदीप खरे यांचा &OpenCurlyQuote;मराठी चित्रपट गीते’ कार्यक्रम&comma; संतोष भांगरे यांचा &OpenCurlyQuote;महाराष्ट्राची लोककला’&comma; गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा गझल कार्यक्रम तसेच वैशाली सामंत&comma; ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या गायन कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला&period; भरतनाट्यम&comma; लावणी&comma; &OpenCurlyQuote;खेळ पैठणीचा’ आणि &OpenCurlyQuote;बॉली बीट्स’ यांसारख्या कार्यक्रमांनीही उत्सवाची रंगत वाढवली&period; १९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;चव महाराष्ट्राची&excl;’ या उपक्रमांतर्गत पुरणपोळी व उकडीचे मोदक यांचे लाईव्ह स्टॉल&comma; &OpenCurlyQuote;कौशल्याला सलाम&excl;’ अंतर्गत दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या कलावस्तूंचे प्रदर्शन व विक्री&comma; तसेच &OpenCurlyQuote;महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा&excl;’ या उपक्रमातून पैठणी&comma; इंदुरी&comma; माहेश्वरी&comma; इरकल साड्या आणि हस्तमाग वस्तूंची मांडणी करण्यात आली&period; विविध स्टॉल्समुळे दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृती&comma; हस्तकला आणि पारंपरिक वस्तूंचा अनुभव घेता आला&period;<&sol;p>&NewLine;<p>गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल निवासी आयुक्त तथा सचिव डॉ&period; श्वेता सिंघल यांनी सर्व नागरिक&comma; कलाकार&comma; स्वयंसेवक&comma; संस्था आणि आयोजन समितीचे आभार मानले&period; दिल्लीतील नागरिक व महाराष्ट्रप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा गणेशोत्सव भक्ती&comma; कला&comma; संस्कृती आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा सुंदर संगम ठरला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version